ताज्या घडामोडी
Loading...
Wednesday, 5 November 2014

Info Post

ग्रामविकासात ग्रामसभेच्या सदस्यांची भूमिका अनन्यसाधारण असते. सदस्यांची सक्रियता आणि विकासाभिमुख भूमिका गावांचा चेहरामोहरा बदलू शकते. पुरूषांसोबतच महिलांचा ग्रामसभेतील सक्रिय सहभाग ग्रामविकासात गुंतलेल्या शासकीय यंत्रणांना अधिक कार्यप्रवण करण्यास कारणीभूत ठरतो. अलीकडे शासनही याबाबत अधिक दक्ष झालेले आहे. ग्रामसभा अधिक बळकट व्हाव्यात, यासाठी विशेष उपाय केले जात आहेत. महिलांचा ग्रामसभेतील सहभाग अनेक अर्थाने उपयुक्त ठरत असल्याने महिला ग्रामसभांना मोठे महत्व प्राप्त झाले आहे. नव्हे, अनेक पायाभूत समस्या मांडण्याचे आणि सोडविण्याचे हे व्यासपीठ ठरू लागले आहे.

महिलांसाठी स्वतंत्र ग्रामसभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे. महिला इतरवेळी होणाèया ग्रामसभेला हजर राहिल्यातरी बरेचदा पुरुषांपुढे बोलण्यास मागेपुढे पाहतात. आपली मते मोकळेपणाने मांडण्यास कचरतात. त्यामुळे महिलांची स्वतंत्र ग्रामसभा घेऊन त्यांनी खुली चर्चा करून त्यांनी त्यांचे प्रश्न, समस्या मांडल्या पाहिजेत, असा महिला ग्रामसभेचा हेतू आहे. सदस्य या नात्याने महिलासुद्धा ग्रामसभेच्या प्रमुख घटक आहेत. त्यांची उपस्थिती आणि सहभाग ग्रामसभेस अधिक फलदायी ठरवितो. मात्र, काही ठिकाणी हे चित्र फारसे समाधानकारक दिसत नाही. विशेषकरून शिक्षणाचे प्रमाण कमी असलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागातील गावांत बोटावर मोजण्याइतक्या महिला ग्रामसभा होत असल्याची वस्तुस्थिती आहे. यात बदल होणे गरजेचे आहे. या पाश्र्वभूमिवर गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, अहेरी, धानोरा, कुरखेडा तालुक्यात उमेदच्या सहका-यांनी महिला ग्रामसभा होण्यासाठी केलेली जागृती आणि प्रयत्न नवा आशावाद निर्माण करणारा आहे. 

१४ ऑगस्ट रोजी होणाèया महिला ग्रामसभेस महिलांनी हजेरी लावून आपली मते मांडावी, यासाठी उमेदच्या सहकाèयांनी चार तालुक्यातील एकूण ३० गावांची निवड केली. या गावांत असलेल्या स्वयंसहायता गटाच्या सदस्यांना याबाबत माहिती देण्यात आली. महिला ग्रामसभेचे महत्व पटवून देण्यात आले. महिलांच्या वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी हे व्यासपीठ कसे उपयुक्त ठरू शकते, याची माहिती दिली. स्वयंसहायता गटाच्या साप्ताहिक बैठका तसेच ग्रामसभेच्या बैठकांत या विषयावर चर्चा घडवून आणण्यात आली. याची फलश्रृती काही ठिकाणी १४ ऑगस्टला, तर काही ठिकाणी १५ ऑगस्टला झालेल्या महिला ग्रामसभेत दिसून आली. बहुतेक ग्रामसभा १४ ऑगस्टलाच झाल्या. कुठे २० टक्के, तर कुठे ६५ टक्क्यांपर्यंत महिलांनी उपस्थिती दर्शविली. एरवी कुठलाही प्रश्न मांडण्यास कचरणाèया महिलांनी ग्रामसचिवांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्य, रोजगार, लहान मुलांचे शिक्षण, अवैध दारूविक्री, शिधापत्रिकांच्या समस्या मांडल्या. ग्रामसभांचे सरासरी ३ तास कामकाज चालले. काही ठिकाणी पहिल्यादांच महिला ग्रामसभा झाल्याने गावक-यांत प्रचंड उत्साह दिसून आला. मनरेगा कामाची मजूरी मिळत नसल्याबाबत तसेच पिण्याचे पाणी मिळत नसल्याबाबत बहुतेक ठिकाणी चर्चा झाली. सर्वंच ग्रामसभांत स्वयंसहायता बचतगटाच्या महिलांचा सहभाग आणि सक्रियता बोलकी होती. 

महिला ग्रामसभेसंदर्भात महत्त्वाचे मुद्दे
  • प्रत्येक ग्रामसभेपुर्वी महिला ग्रामसभेचे आयोजन केले पाहिजे.
  • महिला ग्रामसभेची वेळ व ठिकाण महिलांच्या सोयीनुसार ठरवावी.
  • महिला ग्रामसभेसाठी कोरमची कुठलीही अट नाही.
  • महिला ग्रामसभेचे स्वतंत्र इतिवृत्त असले पाहिजे.
  • महिलांच्या संदर्भातील सर्व शासकीय योजनांचे लाभार्थी महिला ग्रामसभेमध्ये निवडले गेले पाहिजेत.
  • महिला ग्रामसभेत गावातील पिण्याचे पाण्याचे नियोजन होणे अपेक्षित आहे.
  • महिला बालकल्याण योजनेच्या १०% निधीचे नियोजन महिला ग्रामसभेमध्ये करणे बंधनकारक आहे.
  • विविध समित्यांमधील महिला प्रतिनिधींची निवड महिला ग्रामसभेमध्ये झाली पाहिजे.
  • ग्रामसेवकाने महिला ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या आढावा सादर करावा.
  • महिला ग्रामसभेमध्ये आरोग्यसेविकेने हजर असावे.

गजानन ताजने
जिल्हा व्यवस्थापक (ज्ञान व्यवस्थापन)
उमेद, जिल्हा अभियान कक्ष,
गडचिरोली

0 प्रतिक्रिया:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.