‘उमेद‘ अभियानांतर्गत एटापल्ली तालुक्यात स्वयंसहायता गटाच्या बांधणीचे आणि सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. अनेक गावांत ग्रामसंघाची बांधणी झाली असून, त्यांना पुरेसे प्रशक्षण देण्यात आले आहे. या ग्रामसंघाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल, असे उपाय केले जात आहेत. शेतीवर होणाèया खर्चात बचत करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून तालुक्यातील जीवनगट्टा ग्रामसंघामार्फत ‘बांधावरती खत‘ योजना राबविण्यात आली. या उपक्रमामुळे शेतक-यांना वेळवर खत मिळाले. श्रमही वाचले. यासोबतच ४९ हजार ५०० रुपयांची बचत झाली.
ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी तसेच लागवड खर्चात बचत करण्यासाठी कृषी विभागातङ्र्के राबविण्यात येणारी ‘बांधावरती खत‘ योजना शेतक-यांसाठी खूपच फायदेशीर आहे. हाच दृष्टिकोन समोर ठेवून ‘उमेद‘च्या तालुका अभियान कक्षाने जीवनगट्टा येथे ही योजना राबविण्याचे ठरविले. जीवनगट्टा येथे लक्ष्मी महिला ग्रामसंघ आहे. या गावातील ग्रामसंघात समाविष्ट असणा-या बहुतांश महिलांकडे शेती आहे. काही महिला शेतीपूरक व्यवसाय करतात. ग्रामसंघात ९ स्वयंसहायता बचतगट असून, ९८ महिला साप्ताहिक बचत करत आहेत. खत खरेदी करण्यावर मत आजमविण्यासाठी जीवनगट्टा येथील शाळेच्या प्रांगणात ग्रामसंघाची सभा घेण्यात आली. या सभेस कृषी विभागाचे श्री. मेश्राम, ‘उमेद‘चे सहकारी श्री. पांडुरंग हातेकर, श्री. राम वगारहांडे, श्री. नेताजी आत्राम व श्री. भारतभूषण धुर्वे उपस्थित होते. त्यांनी बांधावरती खत योजनेविषयी महिलांना माहिती दिली. शेतीसाठी लागणारे रासायनिक खत किरकोळ स्वरुपात खरेदी न करता शासनाच्या ‘बांधावरती खत‘ योजनेच्या माध्यमातुन खरेदी केल्यास पैशाची आणि श्रमाची बचत होणार असल्याचे पटवून देण्यात आले. त्यामुळे ग्रामसंघाने या योजनेचा लाभ घेण्यास संमती दर्शविली.
ग्रामसंघाने सर्व महिलांसोबत चर्चा केल्यानंतर एकूण ६०० बॅग खरेदी करण्याचे ठरविले. सहभागी सर्व महिलांकडून खतासाठी ३ लाख ४१ हजार रुपये गोळा झाले. या पैशातून कृषी विभागामाङ्र्कत युरिया आणि कृषिउद्योग हे खत खरेदी करण्यात आले. नंतर हा साठा महिलांना वाटप करण्यात आला. हेच खत महिलांनी किरकोळ स्वरूपात खरेदी केले असते, तर तीन लाख ८१ हजार इतका खर्च आला असता. योजनेत सहभागी झाल्याने त्यांची एकूण ४० हजार रुपयांची बचत झाली. सोबतच ग्रामसंघातील महिलांना खत गावातच उपलब्ध झाले. वाहतुकीचा व हमालीचा असा एकूण ९ हजार ५०० रुपयांचा खर्चही वाचला. त्यामुळे प्रत्यक्षात महिलांची ४९ हजार ५०० रुपयांची बचत झाली.

नेताजी आत्राम
तालुका व्यवस्थापक (उपजीविका)
उमेद, तालुका एटापल्ली
तालुका व्यवस्थापक (उपजीविका)
उमेद, तालुका एटापल्ली
0 प्रतिक्रिया:
Post a Comment
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.