चैतन्य चैतन्य झाले आज
आपण सर्वांनी लावूनी परसबाग // धृ//
दगड काडीकचरा वेचू या
मातीचे खोदकाम करु या
एक-एक वाफा बनवू या
जागेला आकार देवू या
बी-बियाणांची देऊनी त्याला साथ
आपण सर्वांनी लावूनी परसबाग // १ //
रासायनिक खत टाळू या
जैविक खत वापरू या
पालापाचोळा आणू या
फवारणी औषध बनवू या
शेण - गोमुत्राची देऊनी त्याला साथ
आपण सर्वांनी लावूनी परसबाग //२ //
सांडपाण्याचा वापर करु या
डबक्यातील कीटक टाळ ूया
नव्या बिमारीला आळा घालू या
सांडपाणी परसबागेला देवूया
सांडपाण्याचे नियोजन करुया आज
आपण सर्वांनी लावुनी परसबाग //३ //
घर फळभाज्यांनी फुलवुया
घरचा ताजा भाजीपाला खाऊया
आरोग्य सुदृढ ठेवूया
होणारा खर्च टाळूया
खर्चाचे नियोजन करुया आज
आपण सर्वांनी लावुनी परसबाग //४//
परसबाग फुलला गं
मनाला आनंद झाला गं
फेर धरुनी नाचू गं
गालातल्या गालात हसू गं
पुढच्या पिढीला परसबागेचे देऊ वसा आज
आपण सर्वांनी लावूनी परसबाग //५ //
शीतल गार्गेलवार
क्षेत्र सहायक, पेंढरी, ता. धानोरा
आपण सर्वांनी लावूनी परसबाग // धृ//
दगड काडीकचरा वेचू या
मातीचे खोदकाम करु या
एक-एक वाफा बनवू या
जागेला आकार देवू या
बी-बियाणांची देऊनी त्याला साथ
आपण सर्वांनी लावूनी परसबाग // १ //
रासायनिक खत टाळू या
जैविक खत वापरू या
पालापाचोळा आणू या
फवारणी औषध बनवू या
शेण - गोमुत्राची देऊनी त्याला साथ
आपण सर्वांनी लावूनी परसबाग //२ //
सांडपाण्याचा वापर करु या
डबक्यातील कीटक टाळ ूया
नव्या बिमारीला आळा घालू या
सांडपाणी परसबागेला देवूया
सांडपाण्याचे नियोजन करुया आज
आपण सर्वांनी लावुनी परसबाग //३ //
घर फळभाज्यांनी फुलवुया
घरचा ताजा भाजीपाला खाऊया
आरोग्य सुदृढ ठेवूया
होणारा खर्च टाळूया
खर्चाचे नियोजन करुया आज
आपण सर्वांनी लावुनी परसबाग //४//
परसबाग फुलला गं
मनाला आनंद झाला गं
फेर धरुनी नाचू गं
गालातल्या गालात हसू गं
पुढच्या पिढीला परसबागेचे देऊ वसा आज
आपण सर्वांनी लावूनी परसबाग //५ //
शीतल गार्गेलवार
क्षेत्र सहायक, पेंढरी, ता. धानोरा
0 प्रतिक्रिया:
Post a Comment
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.