ताज्या घडामोडी
Loading...
Wednesday, 29 April 2015

Info Post
दि. १० डिसेंबर २०१४ ते १२ डिसेंबर २०१४ या कालावधीत ‘उमेद‘च्या जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने गडचिरोली येथे स्वयंसहायता समुहाच्या मुलभूत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्यातील इंटेसिव्ह ब्लॉकमधील तालुका अभियान व्यवस्थापक व प्रभाग समन्वयकांना हे प्रशिक्षण (प्रशिक्षकांचे प्रशिक्षण))देण्यात आले. तालुका व्यवस्थापक- क्षमता बांधणी, तालुका अभियान व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक असे एकूण २८ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
स्वयंसहायता समुहातील सदस्यांना मुलभूत प्रशिक्षण कसे द्यायचे, यावर सहभागी प्रतिनिधींना प्रशिक्षित करण्यात आले. प्रमोद चिंचुरे, तालुका व्यवस्थापक- क्षमता बांधणी, अहेरी व दिलीप जाधव, जिल्हा व्यवस्थापक- क्षमता बांधणी, यवतमाळ यांनी हे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणाच्या अखेरच्या दिवशी आगामी काळात घ्यावयाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन गडचिरोली शहरातील माविमच्या इमारतीत करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला राज्य व्यवस्थापक (समुदाय प्रशिक्षण) वृंदा वझे यांनी भेट दिली. आयोजनासाठी जिल्हा समन्वयक राम पवार यांनी विशेष सहकार्य केले.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment