ताज्या घडामोडी
Loading...
Wednesday, 5 November 2014

Info Post


मायाताई : परसबाग म्हणजे नेमके काय ताई?


कुंदा :घरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर आणि सांडपाण्यावर आधारित उपयुक्त भाजीपाल्यांची बाग म्हणजे परसबाग होय.



मायाताई : पण भाजीपाला सांडपाण्यावर कसा जगणार?


कुंदा : अरे बाबा हे एकदम सोपं आहे! आपण भांडी घासतोय, कपडे धुतोय, अंघोळ करतोय. अशाप्रकारे घरातील प्रत्येक कामांकरीता पाणी वापरतोय. हे वापरलेले पाणी ङ्केकण्यापेक्षा आपल्या घरालगत असणाèया परसबागेत सोडायचे. परसबागेत भाज्यांची लागवड करायची आणि हे पाणी झाडांपर्यंत पोचवायचे. एवढेच नाहीतर स्वयंपाकघरात निर्माण होणारे टाकाऊ पाणीदेखील यासाठी आपण वापरू शकतो. हेच नव्हे, चहा घेतल्यानंतर शिल्लक राहिलेली चहापत्ती, भाज्यांचे अवशेषसुद्धा परसबागेत खतांचे काम करतात. 




मायाताई : फळे आणि भाजीपाला बाजारात असतो ना! मग विनाकारण घरी कशाला लावायचा?


कुंदा : : कशाला म्हणजे काय? बघ! परसबाग लावणे आजची महत्वाची गरज आहे. कारण

१) आपल्याकडे कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. महिला व बालकांमध्ये रक्ताचे प्रमाण कमी आहे. प्रोटिन व विटामीनयुक्त भाजीपाला खाणे आवश्यक आहे. ताज्या भाज्यांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. परसबागेतून ताजा भाजीपाला घेता येतो. पैशाची बचत होते.

२) आपल्याकडे भरपूर जागा आहे. या जागेचा उपयोग शक्य आहे. या जागेवर विनाकारण कचरा वाढू देण्यापेक्षा ङ्कळांची झाडे व भाजीपाला लावायचा. त्यामुळे परिसर चांगला दिसेल आणि दररोजची गरज भागेल. पैशाची बचत होईल. पाण्याचाही सदुपयोग होईल. 

३) पाण्याची बचत अनेक अर्थाने महत्वाची आहे. पाण्याची बचत करण्याकरिता व सांडपाण्यामुळे होणाèया आजारांपासून बचाव करण्याकरिता सांडपाण्याची योग्य विल्हेवाट आवश्यक आहे. या सर्व बाबी परसबागेमुळे कमी श्रमात आणि कमी खर्चात शक्य होईल.

४) महागाई वाढत आहे आणि वाढत्या महागाईला आळा घालण्याचे कामदेखिल परसबाग करू शकते. बाजारातून भाजीपाला घ्यायला खर्च येतो. हा खर्च वाचल्यास तो इतर आवश्यक बाबीवर खर्च करता येऊ शकतो. 

५) वेळेचा सदुपयोग करणे महत्वाचे आहे. परसबाग लावल्याने वेळेचा सदुपयोग होईल आणि परिसरसुद्धा स्वच्छ राहील. 

...आहे ना! परसबाग काळाची गरज.



मायाताई : पटलंय. पण नेमके महत्व कसे सांगता येईल?


कुंदा : : परसबागेचे महत्व पुढीलप्रमाणे थोडक्यात सांगता येईल

१) सांडपाण्याची विल्हेवाट

२) उत्पन्नात वाढ

३) वेळेचा सदुपयोग

४) स्वच्छ वातावरण निर्मिती

५) निरोगी आरोग्य

६) कुपोषणाला व रक्त कमतरतेला आळा

अशाप्रकारे परसबागेमुळे अनेक समस्यांचे निराकरण होईल. येवढेच नाहीतर परसबागेच्या संगोपनाने मुलांवर चांगले संस्कार होईल. मुलांना चांगल्या सवयी लागतील. 


मायाताई : खरंच....! हे अगदी बरोबर आहे. पण मला या सगळ्या मला गोष्टी उशिराने माहित झाल्या. काहीही असो. आता मी परसबाग लावणार आहे. आपण स्वयंसहायता बचतगटांची सभा घेऊ आणि या सभेत इतर महिलांनाही परसबाग लावायला सांगू. यामुळे आपल्याला बाजारातील भाजीपाला घेण्याची गरज भासणार नाही. ताजा भाजीपाला गावातच मिळेल. 


कुंदा देवतळे 
तालुका व्यवस्थापक (उपजीविका)
उमेद, तालुका अभियान कक्ष, 
धानोरा

0 प्रतिक्रिया:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.