ताज्या घडामोडी
Loading...
Wednesday, 29 April 2015

Info Post
अहेरी : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अहेरी तालुका कक्षाच्या वतीने ग्रामपंचायत आलापल्ली येथे नोव्हेंबर महिन्यात ग्रामस्वच्छता अभियान घेण्यात आले.
यानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवर्ग विकास अधिकारी एस. पी. चांदेकर, जि. प. सदस्या विजया विटलाणी, ‘उमेद‘चे तालुका अभियान व्यवस्थापक अनिल गुंजे, सामाजिक कार्यकत्र्या सुशीला भगत, ग्रामपंचायत सदस्य आशिष, केंद्रीय कन्या शाळेचे मुख्याध्यापक नानाजी जकोजवार उपस्थित होते
संवर्ग विकास अधिकारी श्री. चांदेकर यांनी महिला ग्रामसभेमध्ये महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून गावातील समस्या सोडवाव्या. नागरिकांनी आदर्श गाव निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. नवीन महिला स्वयंसहायता गटाचे त्यांनी अभिनंदन केले. श्रीमती विजया विटलानी यांनीदेखील उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले व महिलांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. श्री. अनिल गुंजे यांनी अभियानाचा उद्देश व गटाचे कार्य या विषयी मार्गदर्शन केले.
त्यानंतर आलापल्ली येथील नवीन अंतर्गत क्षेत्र समुदाय संसाधन व्यक्तींनी सामाजिक उपक्रमाची  सुरुवात म्हणून निराधार, गरीब महिला श्रीमती शारदा परलवार यांना एकूण १५ किलो तांदूळ व १५०० रुपये दिले. ही मदत स्वयंसहायता गटातील गरीब महिलांनी एकत्र करुन दिली. यानंतर उपस्थित सर्व मान्यवर व महिलांच्या मदतीने केंद्रीय कन्या शाळा, आलापल्ली ते एटापल्ली चौक ते आलापल्ली बसस्थानक मार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेविषयी जागृतीपर घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमात आलापल्ली येथील सुमारे ३५० महिलांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती शांता खांडेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. गंगाधर डोर्लीकर, श्री. प्रमोद चिंचुरे, श्री. विनोद बोबाटे, श्री. सतीश उमरे, श्रीमती रजनी गड्डम, अशुना अकुला, सय्यद गौसिया, ललीता ठाकूर, गिरीधरराव बुजगुनला, संपत कवमपल्ली यांनी सहकार्य केले.

 
शिवणीपाठ, नागेपल्लीत सावित्रीबाई जयंती
अहेरी :  महाराष्ट् राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मॉं महिला ग्रामसंघामार्फत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सरपंच श्री. वेलादी होते. यावेळी विस्तार अधिकारी श्री. काळबांधे, श्री. महावीर मेश्राम, मंगला आडूरवार, क्षेत्र समन्वयक विनोद बोबाटे उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकात श्री. विनोद बोबाटे म्हणाले, महिलानी संघटित होऊन सामाजिक कार्यात सहभागी होणे काळाची गरज आहे. त्याशिवाय गावाचा विकास होणार नाही. श्री. काळबांधे यांनी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. श्री. मेश्राम यांनी महिलानी आपले कार्यक्षेत्र  व्यापक करावे, असे आवाहन केले. गावातील दीडशेहून अधिक महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी  मिनती हलधर, कल्पना कोकीरवार, शंकर कोकीरवार, वच्छला निकेसर, पंच

कुलाबाई कोकीरवार, किशोर आडूरवार, अर्चना कुळमेथे, पुष्पा कावळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन सोनी कावळे यांनी केले

0 प्रतिक्रिया:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.