'उमेद' अभियानातंर्गत नवीन गटांसोबतच जुन्या स्वयंसहायता गटांना अधिक सक्षम करण्याचे काम सध्या गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या गटांना भेटी दिल्यानंतर किंवा गटाच्या देवघेवी बघितल्यानंतर सुधारणांना बराच वाव असल्याचे दिसून येते. विशेषकरुन कर्ज परतफेडीत नियमिततेचा मुद्दा अधिक संवेदनशिलतेने हाताळण्याची गरज आहे.
वेगवेगळ्या योजनांतर्गत यापूर्वी स्वयंसहायता गट तयार करण्यात आले आहेत. कुरखेडा तालुक्यातही अनेक गावांमध्ये महिला स्वयंसहायता गट आहेत. जवळपास सर्वच गटाची बँकखाती आहेत. बचतीचे व्यवहार नियमीत आहेत. बचतीच्या प्रमाणात वाढ होते आहे. गटाअंतर्गत कर्ज व्यवहार होत आहेत. मात्र, परतङ्केड पाहिजे तशी नियमीत नसल्याचे दिसून येते. काही गटांकडून कर्ज घेतल्यानंतर रक्कम टप्याटप्याने परत करण्याऐवजी ती एक किंवा दोन वर्षानंतर एकाचवेळी व्याजासह परत केली जाते. त्यामुळे नियमीत अंतर्गत कर्ज वितरणावर त्याचा परिणाम जाणवतो. हाच प्रकार काहीअंशी बँक कर्जाबाबतही होताना दिसून येतो.
बँक कर्ज खात्यामध्ये नियमीत परतफेड नसल्याने खाती थकीत होतात. खाते नियमीत करण्यासाठी बँकेकडून ब-याचवेळा बचतखात्यातून बचतीची रक्कमही कर्जखात्यात वर्ग करण्यात येत असल्याचे आढळून येते. अनेकदा या गोष्टीची गटाला माहिती नसते. त्यामुळे बचत खात्यातील व्यवहारावरुन संभ्रम निर्माण होतो. अनेक गटांना 'उमेद' अभियान सुरू होण्यापूर्वी व्यवसाय कर्ज देण्यात आले आहे. त्यामुळे अनुदानाची रक्कम वजा करून उर्वरित रकमेवर बँकेकडून व्याज आकारणी अपेक्षित होती. परंतु काहीवेळा संपूर्ण रकमेवरच व्याज आकारणी झाल्याचे दिसून येते. हा प्रकार टाळण्यासाठी उपाय आवश्यक आहे. व्याज वाढल्याने स्वयंसहायता गटांत गैरसमज निर्माण होऊ शकतात. गटाचे सक्षमीकरण करताना याकडे सर्वांचेच विशेष लक्ष आवश्यक आहे.
काही गटांमधे नियमित सभा होत नाहीत. सोयीप्रमाणे बचतीची रक्कम जमा केली जाते. स्वयंसहायता गटांना अनियमिततेमुळे होणारे धोके समजावून सांगितल्यास गट नियमित बैठकांकडे वळतात. गटातील आर्थिक व्यवहाराच्या नोंदी अध्यक्ष, सचिव यापैकी एकजण करतात. काही ठिकाणी स्वतंत्र पुस्तक संचालक नसल्याने सर्व आर्थिक व्यवहार अध्यक्ष किंवा सचिव हेच करतात. त्यामुळे आर्थिक व्यवहार पारदर्शक राहात नाहीत. उपरोक्त त्रुटी करण्यासाठी पंचसूत्रीचे तत्त्व खूपच मार्गदर्शक ठरते. पंचसूत्री, दशसूत्रीबाबत मार्गदर्शन केल्यानंतर स्वयंसहायता गटांत लक्षणीय सुधारणा होतात. गटांचे व्यवहार अध्यक्ष, सचिव, पुस्तक संचालक यांच्याव्दारे नोंदीसह होणे व सदस्यांना माहित असणे. सभेनंतर सर्वांना वाचून दाखवणे व मंजुरी घेणे या बाबी खूप महत्वाच्या आहेत.
श्रीकांत सूर्यवंशी
तालुका अभियान व्यवस्थापक
उमेद तालुका अभियान कक्ष, कुरखेडा
0 प्रतिक्रिया:
Post a Comment
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.