ताज्या घडामोडी
Loading...
Wednesday, 29 April 2015

Info Post
शेतीला तसेच इतर व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन या व्यवसायाची निवड केल्यास या उद्योगांतून वर्षभर रोजगार मिळवला जाऊ शकतो. शिवाय वर्षभर खात्रीशीर व सातत्यपूर्ण उत्पन्न मिळवता येईल. शेती व मजुरी आधारित शेळीपालन हा महत्त्वाचा जोडधंदा आहे. शेतीच्या उत्पन्नात पशुधनापासून मिळणा-या उत्पन्नाचा वाटा एक चतुर्थांश आहे. हा व्यवसाय कमी खर्चाचा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश भाग हा जंगलाचा असल्यामुळे शेळीपालनास मोठा वाव आहे.
शेतीशी संलग्न असलेला पशुपालन हा व्यवसाय फार पुरातन काळापासून केला जातो. समाजातील फार मोठा वर्ग या व्यवसायावर अवलंबून आहे. जगातील सर्वाधिक पशुधन भारतात असून, आपला देश दुग्धोत्पादन व मासोत्पादनात जगात अग्रेसर आहे. असे असले, तरी आपल्या देशातील तसेच राज्यातील बहुतांश जमीन ही पावसावर अवलंबून असलेली म्हणजे कोरडवाहू आहे. त्यामुळे पावसाळ्याचे चार महिने सोडल्यास उर्वरित आठ महिने शेतक-यांना, मजुरांना रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. अशावेळी शेळीपालन व्यवसाय उत्तम पर्याय ठरु शकतो.
जगात शेळ्यांच्या १०२ जाती आढळतात. त्यापैकी २० जाती भारतात आढळतात. शेळ्यांच्या संख्येत भारत प्रथम क्रमांकांवर असून, त्याची संख्या १२ कोटी इतकी आहे. भारतात शेळी हा पारंपरिक व्यवसाय आहे. दूध, मांस, खत याच्या उत्पादनासाठी शेळीपालनाचा व्यवसाय केला जातो. महाराष्ट्र, गुजरात, बिहार, पश्चिम, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व कर्नाटक या राज्यात शेळीपालनाचा व्यवसाय मोठया प्रमाणावर केला जातो. महाराष्ट्रातील पशुधनात शेळ्यांचे प्रमाण ३८.७५% आहे. भारतात दूध व मासांसाठी उस्मानाबादी, बारबेरी, जमनापरी, मलबारी, मेहसाणा, झालावार्डी (गुजरात), बिटल (पंजाब), सिरोही (अजमेरी), कच्छी, सानेन या जाती तसेच मांस उत्पादनासाठी काळी बंगाली, आसाम डोंगरी, तपकिरी बंगाली, मारवाडी, गंजम, काश्मिरी इत्यादी जातीच्या शेळ्या, तर लोकरीसाठी पद्मिनी (काश्मीर), गद्दी (हिमाचल प्रदेश) अंगोरा इ. जातीच्या शेळ्या पाळल्या जातात. गडचिरोली जिल्ह्यात या व्यवसायातून स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात.

१) शेती आधारित शेळीपालन या जोडधंद्याला ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. भारतात शेळीला गरिबांची गाय म्हणतात. लघू आणि मध्यम शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, समाजातील दुर्बल घटक यांचा शेळीपालन हा महत्त्वाचा व्यवसाय आहे.
२) शेळी हा प्राणी निसर्गतः काटक असल्यामुळे रोगांना कमी बळी पडतात. त्यांच्यात रोगराईचे प्रमाण कमी असते. त्यामुळे औषधे व इतर वैद्यकीय खर्च कमी येतो.
३) शेळी ही काटक असल्याने विपरीत हवामानाशी जुळवून घेऊ शकते. त्यामुळे दुर्गम (गडचिरोली) भागातही हा व्यवसाय केला जातो.
४) शेळ्या या खुरटे गवत, पाला व अशा निकृष्ट दर्जाच्या व सहज मिळणा-या चा-यावर जगतात.
५) गाई व म्हशीपेक्षा शेळ्यापासून लवकर उत्पादन मिळते.
६) शेळ्यांना निवा-याकरीता कमी जागा लागते. त्यामुळे निवारा तयार करण्यासाठी कमी खर्च होतो. त्यांच्या संगोपनात कमी खर्च लागतो.
७) शेळ्यांपासून कमी खर्चात उत्तम खत मिळते. हे खत विकून चांगले उत्पन्न मिळते.
८) शेळीपालन हा व्यवसाय महिलांमार्फत वैयक्तिकपणे qकवा महिला बचतगटांमार्फत सहजपणे केला जाऊ शकतो.
९) शेळीपालन हा व्यवसाय अल्प भांडवलावर केला जाऊ शकतो.
१०) शेळ्यांचा प्रजोत्पादन दर उच्च आहे.
११) शेळ्यांचे मांस कमी चरबीचे व चवदार असल्याने ते लोकांना आवडते.
१२) गरजेच्या वेळी शेतक-यांना शेळ्या, त्यांचे खत, चामडी विकून पैसा मिळवता येतो.


सोनाली भोकरे
जिल्हा व्यवस्थापक : उपजीविका (बिगरशेती)
उमेद, गडचिरोली

0 प्रतिक्रिया:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.