कुटुंबाचा कणा म्हणजे त्या घरची स्त्री. तिच्या माध्यमातूनच कुटुंबाचा, समाजाचा विकास होतो. याच गोष्टीचा विचार करून वाकडी येथे इंदिरा महिला स्वयंसहायता बचतगटाची स्थापना करण्यात आली. मागील दोन वर्षापासून या महिला गटाच्या माध्यमातून खत खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा या तालुक्याच्या ठिकाणापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी या गावातील १४ महिलांनी एकत्रित येऊन २७ डिसेंबर २००७ रोजी महिला स्वयंसहायता गटाची स्थापना केली. या गटाला इंदिरा महिला स्वयंसहायता बचतगट असे नाव देण्यात आले. गटातील बहुतेक महिला दारिद्य्ररेषेखालील आहेत. गटाची मासिक बचत ३० रुपये प्रती सदस्य इतकी आहे. गटाचे खाते कुरखेडा येथील बँक ऑफ इंडिया येथे आहे.
इंदिरा महिला स्वयंसहायता बचतगटाची सभा नियमित होते. मासिक बचतीतही नियमितता आहे. दोन वर्षे गट नियमित सुरू असल्याने गटातील सदस्यांनी एखादा व्यवसाय सुरू करावा, असे ठरविले. गटातर्फे बॅक ऑफ इंडियाकडे कर्जाची मागणी करण्यात आली. बॅकेने ७ मे २००९ रोजी २५ हजार रुपयांचे कर्ज दिले. गटाने या पैशातून धान्यखरेदी केली. काही महिलांनी शौचालय बांधकामाचे काम हाती घेतले. यात त्यांना नफा मिळाला. पंचायत समितीनेही गटाला १० हजार रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करून दिले. व्यवसायाचा पहिला प्रयोग यशस्वी झाल्याने इंदिरा महिला स्वयंसहायता गटाने बँकेकडून व्यवसाय कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. इंदिरा महिला स्वयंसहायता बचत गटाने स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजने अंतर्गत २००९ ते २०१० या कालावधीत बँक आँफ इंडिया, कुरखेडा यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. या रकमेतुन गटाने खत खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु केला. यातून गटाला नफा मिळाला.
आज सर्व सभासदांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. गटातील सभासद सामाजिक कार्यात सहभागी होतात. प्रत्येक सदस्याला व्यवसायाची ओढ लागलेली आहे. गटाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू आहे. खत खरेदी- विक्री व्यवसाय वाढविण्याचा गटाचा मानस आहे. या गटाची प्रेरणा घेऊन गावातील इतर गटही बचतीकडे वळले आहेत.

भूपेंद्र करोडकर
क्षेत्र समन्वयक, कुरखेडा-वडेगाव
उमेद, तालुका कुरखेडा
0 प्रतिक्रिया:
Post a Comment
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.