ताज्या घडामोडी
Loading...
Wednesday, 29 April 2015

Info Post
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कमी खर्चामध्ये मिरची लागवड करण्याविषयी मार्गदर्शक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाने प्रेरित होऊन चिं
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यामध्ये चिंचटोला हे लहानसे गाव आहे. कुरखेडाहून ११ किमी अंतरावर हे गाव आहे.  चहूकडे वन आणि हिरवेगार डोंगर. परिसर निसर्गरम्य असला, तरी विकासापासून दूर आहे. या गावात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत गावातील १२ महिला एकत्र आल्या. त्यांनी १० नोव्हेंबर २०१४ रोजी इंदिरा महिला स्वयंसहायता बचतगटाची स्थापना केली. इंदिरा महिला स्वयंसहायता बचतगटाची नियमितपणे दर आठवड्याला बैठक होते. बैठकीमध्ये कमी खर्चामध्ये मिरची लागवड करण्याविषयी मार्गदर्शक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाने प्रेरित होऊन मनिषा बालाजी तुलावी यांनी १ एकर क्षेत्रात मिरची लागवड केली.
मनिषा बालाजी तुलावी यांनी आपल्या शेतात गावठी मिरचीची रोपे तयार केली. बी पेरणी करताना बीज प्रक्रया केली. रोपांची लागवड करताना जमिनीची नांगरणी व कुळवणी करून जमीन भुसभुशीत केली. दर हेक्टरी २० टन याप्रमाणे शेणखत जमिनीवर पसरले.  ६ ते ९ इंच उंचीच्या ४-५ आठवड्यांच्या रोपांची लागवड केली. मिरचीची ३० बाय ३० सेंटीमीटर अंतरावर लागवड केली.
चुरडा आदी रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे कीटकनाशकाची दोनवेळा फवारणी केली आहे. यामुळे तुलावी यांना मिरचीचे चांगले पीक आले आहे. या पिकापासून त्यांना चांगला फायदा होण्याची अपेक्षा आहे.

महेंद्रकुमार बिसेन
तालुका व्यवस्थापक : आजीविका
तालुका अभियान कक्ष, कुरखेडा


चटोला येथील मनिषा बालाजी तुलावी यांनी १ एकर क्षेत्रात  मिरचीची लागवड केली.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.