स्वयंसहायता गटांच्या महिलांना धान उत्पादनाचे आधुनिक तंत्र अवगत व्हावे, यासाठी ‘उमेद‘च्या वतीने १३ महिलांनी छत्तीसगड राज्यातील उपक्रमांना भेट दिली. १० ते १२ नोव्हेंबर २०१४ दरम्यान आयोजित या दौ-यात महिलांनी धान उत्पादनांचे वेगवेगळे तंत्र जाणून घेतले.
छत्तीसगड राज्यात ‘बिहान‘ कार्यक्रमातंर्गत धान उत्पादनवाढीचे प्रयोग सुरू आहेत. दौ-यादरम्यान महिलांनी राजनांदगाव तालुक्यातील मुदापूर गावाला भेट दिली. महिलांनी प्रत्यक्ष पाहणी तसेच मार्गदर्शनाव्दारे विविध कौशल्ये जाणून घेतली. एटापल्ली आणि अहेरी तालुक्यातील स्वयंसहायता बचतगटाच्या महिलांनी या दौèयात सहभाग नोंदविला. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जैविक औषधांचा उपयोग, सामूहिक कीड नियंत्रण, दर्जेदार बियाण्यांचे महत्व महिलांनी जाणून घेतले. या दौ-यात जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र इंगळे, तालुका व्यवस्थापक नेताजी आत्राम, शांता खांडेकर, कुंदा देवतळे यांनीही भाग घेतला.

0 प्रतिक्रिया:
Post a Comment