ताज्या घडामोडी
Loading...
Wednesday, 29 April 2015

माहिती व्यवस्थापन प्रणाली कुठल्याही अभियानाचा एक अविभाज्य भाग असतो. वरकरणी ही प्रणाली आकडेमोडीचा भाग वाटत असली, तरी अभियानाची उद्दीष्टे साध्य करण्यासाठी ही प्रणाली मार्गदर्शकाची भूमिका वठविते.
विकास कार्यक्रम किंवा अभियान सुरू करण्यामागे विशिष्ट उद्देश असतो. या उद्देशापर्यंत पोचण्यासाठी निश्चित अशी कार्यपद्धती स्वीकारण्यात येते. या कार्यपद्धतीवर सुक्ष्म नजर ठेवण्याचे काम माहिती व्यवस्थापन प्रणाली करते. अभियानाची ध्येय विशिष्ट कालावधीत पूर्ण करण्यात माहिती व्यवस्थापन प्रणाली मार्गदर्शकाची भूमिका बजावते. अभियानाच्या वेगवेगळ्या स्वरूपाची वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन, शास्त्रशुद्ध मांडणी आणि विश्लेषण या त्रिसूत्रीवर या प्रणालीचे काम चालते.
गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता माहितीचे संकलन निश्चितच जिकीरीचे काम आहे. ‘उमेद‘ अभियानात जिल्हा अभियान कक्ष, तालुका अभियान कक्ष, क्षेत्र समन्वयक, अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती, पुस्तक संचालक, ग्रामसंघ आणि स्वयंसहायता बचतगट हे माहिती संकलनात उपयोगी पडणारे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे या घटकांकडून अचूक, वेळेत आणि नियमितपणे माहिती प्राप्त होणे गरजेचे असते. माहितीच्या अचूकतेचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे त्या-त्या घटकांकडून अचूक माहिती मिळविणे तसेच त्याची वेळोवेळी खातरजमा करणे अत्यंत आवश्यक आहे.
सांख्यिकी माहितीचा उपयोग अभियानाची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी केला जातो. अभियानांतर्गत ठरविण्यात आलेली उद्दिष्टे विहित मुदतीत पूर्ण केली जातात अथवा नाही याची खात्री याव्दारे करता येते. प्रसंगी माहितीचा उपयोग उद्दिष्टात अथवा कार्यपद्धतीत योग्य तो बदल करण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो.
माहिती व्यवस्थापन प्रणालीबद्दल सर्वच सहका-यांनी याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. माहिती व्यवस्थापन प्रणाली कामकाजाच्या एकंदरित गुणवत्तेत आणि अभियानात अत्यंत महत्वाचा घटक आहे. अभियानाला पूरक अशी माहिती संगणकीकृत केली जात असल्याने ही माहिती पाहिजे तेव्हा उपयोगात आणता येते.


नितीन कटकमवार,
जि. व्य. : माहिती व्यवस्थापन प्रणाली
जिल्हा अभियान कक्ष, गडचिरोली

1 प्रतिक्रिया:

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.