ताज्या घडामोडी
Loading...
Wednesday, 5 November 2014

Info Post


भारतीय समाजात स्त्रियांवर अनेक बंधने लादली जातात. काही बंधने ही पारंपरिक स्वरूपाची आहेत, तर काही जाणूनबुजून लादली जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील स्त्री जीवन भक्कमपणे आपल्या पायावर उभे राहिल्याचे दिसून येत नाही. आर्थिक, वैचारिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या ती जोपर्यंत स्वयंपूर्ण होत नाही, तोपर्यंत ती बंधमुक्त किंवा सक्षम झाली, असे म्हणता येणार नाही. हा बदल घडविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशक्षण मोलाची भूमिका बजावू शकते. या पाश्र्वभूमीवर 'उमेद' अभियान अधिक प्रासंगिक ठरते. 

स्त्री सक्षमीकरणासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. तथापि, अजून बराच मोठा टप्पा गाठावा लागणार आहे. आजही अनेक महिला 'चूल आणि मुल' या संस्कृतीत अडकून पडलेल्या दिसतात. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. हे कार्य स्वयंसहाय्यता गटांकडून मोठया प्रमाणात करता येणे शक्य आहे. आज स्वयंसहायता गटाच्या माध्यमातुन महिला घराच्या बाहेर पडताना दिसत आहेत. नवनवीन विचारांची देवाणघेवाण होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विचार केला असता प्रामुख्याने महिलांच विविध कामे करताना दिसतात. मात्र, त्या तुलनेत त्यांचा विकास झालेला दिसत नाही. शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे येथील महिलांचा आर्थिक तसेच वैचारिक विकास झालेला दिसत नाही. अशा महिलांना विविध प्रशक्षणाच्या माध्यमातून विकासाच्या प्रवाहात आणता येऊ शकते.

महिला खूप सहनशील, भावनिक व कामाप्रती समर्पणाची भावना असलेल्या असतात. त्यांच्यामध्ये वैचारिकता, व्यावहारिकता, विकास साधण्याची तळमळ असते. मात्र, योग्य मार्गदर्शन आणि संधी न मिळाल्याने त्या विकासात खूप मागे पडल्याचे दिसून येते. योग्य प्रशक्षण मिळाल्यास त्या आपला विकास साधू शकतात. पिढयानंपिढया चालत आलेल्या चालीरीती, स्त्रियांविषयी असलेला पुरुषांचा दृष्टिकोन बदलणं नक्कीच सोपे नाही. मात्र, अशक्यही नाही. वेळोवेळी विविध प्रकारचे प्रशक्षण देऊन महिलांतील सुप्तशक्तींना जागृत करता येऊ शकते. कुटुंबाचा पर्यायाने गावांचा विकास करायचा असल्यास महिला शक्तीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक गरजा लक्षात घेऊन प्रशक्षणाचे मोठ्या प्रमाणात आयोजन आवश्यक आहे. 'उमेद' अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांना दिले जाणारे क्षमता बांधणीचे प्रशिक्षण ग्रामीण भागातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे. 


भारत पवार
ता. व्यवस्थापक (क्षमता बांधणी)
उमेद, तालुका अभियान कक्ष, धानोरा

0 प्रतिक्रिया:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.