एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमात काम सुरू असताना असं कधीच वाटलं नव्हतं. जी की, दुसरी एखादी अशी संधी, जी रोजच्या जीवनाला वेगळं वळण देईल. पण ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना‘मुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागात काम करण्याची संधी मिळाली. माझ्या ‘रुटीन लाईफ‘ला एक वेगळं ‘वळण‘ मिळालं.
‘गडचिरोली‘ महाराष्ट्रातील अतिमागास, अतिदुर्गम म्हणून ओळखला जाणारा जिल्हा. या अभियानात मला सेवेचा मिळालेला पहिला जिल्हा मिळाला तो गडचिरोलीच. सोलापूर ते गडचिरोली असा नवा प्रवास सुरू झाला. माझ्या मनात कुतूहल होते ते अतिमागास, अतिदुर्गम भाग पाहण्याचे. नियुक्ती प्रक्रया पूर्ण झाली आणि दुसèया दिवसांपासून प्रशक्षण सुरू झालं. अहमदनगर जिल्ह्यातील ‘पुरुषवाडी‘ हे गाव आम्हाला प्रशक्षणाकरिता नेमून देण्यात आलं होतं. गरीब कुटुंब आणि गरिबीचा जवळून अभ्यास करायचा होता आणि तोसुद्धा गरीब कुटुंबात राहूनच. मी ज्या कुटूंबासोबत राहून प्रशक्षणाचा कालावधी पूर्ण केला, त्या कुटुंबात फक्त तीन व्यक्ती राहत होत्या. घराच्या पडवीत आमची सोय केली होती. आयुष्यात पहिल्यांदा मी या कुटुंबात तांदळाची चपातीची चव घेतली. तिथलं निसर्गसौंदर्य फार सुंदर होतं. चारीबाजूने डोंगर आणि त्या डोंगराच्या कुशीत वसलेलं हे ‘पुरुशवाडी‘ हे गाव. तिथले ७ दिवस कसे गेले, तेच कळले नाही. त्या कुटुंबांनी आणि त्या गावातील लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. तेथे नवीन मित्र मिळाले.
त्यानंतर पुन्हा ७ दिवसाचं प्रशक्षण पुणे येथे पूर्ण केले. तीन दिवसांच्या अंतराने नियुक्तीच्या ठिकाणी हजर व्हायचं होतं. पुन्हा एकदा घर सोडून दूर जायचे, या विचाराने मी थोडाफार अस्वस्थ होतोच. अखेर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्याचा प्रवास सुरू झाला.
गडचिरोली जिल्ह्यातील आंध्रप्रदेशच्या सीमेवरील अहेरी हा तालुका. वैनगंगा, गोदावरी, इंद्रावती व पामुलगौतम या बारमाही नद्या या जिल्ह्यातून वाहतात. खोब्रागडी, गाढवी, सती, कठाणी, बांडिया, पर्लकोटा, पोटफाडी, दिना व वैलोचना या उपनद्या आहेत. मोठ्या प्रमाणात जंगलाचा भाग. साग, बांबू यासारखे इतरही अनेक प्रकारच्या वृक्ष इथे आढळतात. जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे.
गोंड, माडिया या आदिवासी जमाती इथे राहतात. नवा प्रदेश,नवी माणसं, नवी भाषा. सगळंच नवं होतं. आल्यानंतर पहिली भेट ‘कलेम‘ या गावाला देण्याचा योग आला. गावात जाण्यासाठी रस्ता नाही. रानातील पायवाट हा एकमेव जाण्याचा दुवा. कमीत कमी ३ किलोमीटर चालत जायचे होते. उत्साह होताच. चालत चालत १ किलोमीटर अंतर कापले आणि पुढची वाट चालवेना. पर्याय नव्हता. वाट जरी दुर्गम असली, तरी खूप छान होती. उंच-उंच सागाची, बांबूची झाडे. वेगवेगळ्या पक्ष्याचा आवाज. शांत. कसला गोंधळ नाही की, वाहनांचे कर्णकर्कश आवाज नाही. एक वेगळाच अनुभव. रोजच्या गोंधळात हाच निवांतपणा शोधत होतो. तो मिळाला. भ्रमणध्वनी केव्हाच ‘आउट ऑफ रेंज‘ झाला होता. ती शांतता आणि एकटेपण अनुभवत होतो. चालत असताना क्षणभर थांबलो. त्या ठिकाणी एक तलाव होता. तिथे काही लोक मासे पकडत होते. पांढ-या शुभ्र पक्ष्यांचा थवा, त्या तलावाशेजारील झाडावर बसलेला होता. त्याचं तलावातील प्रतिबिंब फारच विलोभनीय दिसत होतं. ते सगळं डोळ्यांत साठवत पुढे निघालो. कौलारुची छोटी-छोटी घरे दिसू लागली. साधारण पंधरा-वीस घरे असतील. प्रत्येक घरासमोर लाकडाचे कुंपण. शेणाने स्वच्छ सारवलेलं अंगण. आम्ही तिथे पोहोचताच, स्वयंसहायता गटातील महिला, त्या घरी गोळा झाल्या. त्या घरातील महिलेने आम्हाला पिण्यासाठी पाणी दिले. माझ्या जवळच्या पाण्याच्या बाटलीतले पाणी मी पिणार, इतक्यात माझे लक्ष त्या महिलेकडे गेले. बाटली बाजूला ठेवून मी तिच्याकडचे पाणी प्यालेलं पाहून त्या महिलेला झालेलं आनंद तिच्या चेह-यावर दिसत होता.
गटाची बैठक ‘इतनी शक्ती हमे देना दाता ‘ प्रार्थनेने सुरू झाली. त्या शांत आणि प्रसन्न वातावरणात प्रार्थनेला पक्षीही आपल्या मधुर आवाजाने साथ देत होते. परिचय, उपस्थिती, बचत आणि पुढच्या गटाच्या बैठकीचे ठिकाण ठरवून बैठक संपली. परतीचा प्रवास सुरू झाला. पण, मी अजूनही मनाने तिथेच होतो. गावात पोचायला नीट रस्ता नाही. गावात वीज नाही. पिण्याचे पाणीही दूरवरून आणावं लागतं. कुठल्याही मुलभूत सुविधा नाही, तरी ही माणसं वर्षानुवर्षे त्या जंगलात कसे जगत असतील, या प्रश्नाचे उत्तर मी शोधत होतो. कदाचित पुढच्या प्रवासात याचे उत्तर मिळेल, या आशेने.

प्रमोद चिंचुरे
तालुका व्यवस्थापक : क्षमता बांधणी
उमेद , तालुका अहेरी
तालुका व्यवस्थापक : क्षमता बांधणी
उमेद , तालुका अहेरी
0 प्रतिक्रिया:
Post a Comment
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.