ताज्या घडामोडी
Loading...
Wednesday 5 November 2014

Info Post

राज्यात औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्यास ओळखले जाते. जिल्हयाचा ८० टक्क्यांहून अधिक भाग जंगलांनी व्यापलेला आहे. शेतीखालील भाग सुमारे १३ टक्के आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने आदिवासी समाजबांधव राहतो. घनदाट जंगलामध्ये विखुरलेल्या आणि गुडयापाडयाच्या स्वरूपात हा समाज येथे पारंपरिक पद्धतीने जीवन जगत आहे. 

मागास जिल्हा असल्यामुळे राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या शाखा अगदीच कमी आहे. उमेद अभियानाअंतर्गत येत असलेल्या चार इंटेन्सिव्ह तालुक्यात ङ्कक्त ३४ शाखा आहेत. लोकसंख्या व दुर्गम परिसराच्या मानाने हे प्रमाण खूपच कमी आहे. उमेद अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात इंन्सेटिव्ह, सेमी इंन्सेटिव्ह व नॉन इंन्सेटिव्ह तालुक्यात आर्थिक वित्तीय समावेशनाचे कार्य सुरू आहे. या माध्यमातून स्वयंसहायता बचत गटांना बँकेच्या विविध सोयी, सुविधा तसेच सेवांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रामुख्याने बचत, कर्जवाटप, विमासुविधा आदींवर भर आहे.

अभियानाअंतर्गत वित्तीय समावेशनाचे कार्य सुरू आहे. या संकल्पनेत बचतगट स्थापन झाल्यानंतर २ महिन्यांच्या आत राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे, गटाला फिरते भांडवल देणे, सुक्ष्म कर्ज आराखडा मंजुर करणे, गटांत अंतर्गत आर्थिक व्यवहार, कर्जवाटप आदीचा समावेश आहे. यासोबत बँकेकडून कर्ज मिळविण्यात सहायक भूमिका वठवून गरीब कुटुंबांच्या शाश्वत उपजीविकेसाठी प्रयत्न केले जात आहेत. स्वयंसहायता गटाच्या सदस्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे जिवनमान उंचावणे, वृद्ध व अपंग तसेच वंचितांना विम्याचा लाभ, सरकारी योजनांचा लाभ, मुला-मुलींना सरकारी योजने अंतर्गत शिष्यवृत्ती, मोफत पुस्तके, गणवेश, आदिवासी वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्यास सहायकारी भूमिका निभावण्याचे कामही अभिप्रेत आहे.


वित्तीय समावेशनाचे फायदे
वित्तीय समावेशन झाल्यामुळे गटाच्या आर्थिक कामकाजात सुसूत्रता येईल. गटाच्या अन्य सामाजिक आणि उपजीविकेच्या उपक्रमांना बळकटी येण्यास मदत होईल. गटातंर्गत पारदर्शकता आणि विश्वासाचे वातावरण वाढेल. फिरते भांडवल, नंतर सुक्ष्म पत आराखडा (MCP), त्याचप्रमाणे बँकेचे अल्प, मध्यम मुदती कर्ज वेळेवर व आवश्यकतेनुसार मिळेल. याचा लाभ शाश्वत गटाच्या लघुपल्ल्याच्या गरजा भागविण्यासाठी तसेच उपजीविकेची साधने बळकट करण्यास होईल.


वित्तीय समावेशनासाठी महत्त्वाच्या बाबी


१.गटांची अंतर्गत बचत/कर्ज/आवश्यकता

२.गाव/गटनिहाय आवश्यकता

३.गटात/समुहात समन्वय

४.गटांचे वार्षिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न.

५.वेळेवर ङ्किरते भांडवल/सुक्ष्म कर्ज आराखडा/बॅक कर्ज/कर्ज वसुली

६.सोप्या पद्धतीने कर्ज प्रस्ताव/किचकट नसणारी बॅक प्रक्रया/कागदपत्रे.

७.कर्ज मंजुरीची सोपी पद्धत.


आर्थिक /वित्तीय समावेशनाची गरज

१.आर्थिक दिशा दर्शविण्यासाठी.

२.आर्थिक नियोजनाचा पाया उभारण्यासाठी.

३.कुटुंबाच्या दैनिक, आपातकालीन, मध्यमकालीन व दीर्घकालीन गरजांच्या परिपुर्ततेकरीता.

४.कुटुंबाच्या आपातकालीन गरजांच्या पुर्वनियोजनाकरीता (विमा, आपत्ती व्यवस्थापन, वृध्दपेन्शन इत्यादी) 

५.कुटुंबाचा महत्वाचा सदस्य म्हणून जाणीव करून देण्याकरिता.

६.सुरक्षित बचत व त्याचे नियोजन/बचतीची सवय लावण्यासाठी.

७.आर्थिक नियोजनात निर्णय क्षमता वाढविण्यासाठी.

८.बचत खाते उघडताना आवश्यक कागदपत्रांची माहिती जाणून घेण्याकरिता.

९.बँकेच्या कर्जा विषयी/योजनांची माहिती जाणून घेण्याकरिता. 

१०.कर्ज परतफेडीचे फायदे जाणून घेण्याकरिता.

११.गरजेनुसार कर्जाची उभारणी.

१२.भांडवल निर्मीतीच्या गरजांच्या पूर्ततेसाठी

१३.उत्पन्न व खर्च आराखडा जाणून घेण्याकरिता.


श्री. बी.पी. मेश्राम 
जिल्हा व्यवस्थापक 
(वित्तीय समावेशन), उमेद,गडचिरोली

0 प्रतिक्रिया:

Post a Comment