ताज्या घडामोडी
Loading...
Wednesday, 5 November 2014

Info Post
स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातुन गरीब कुटुंबांचा विकास साधता येतो. गटाच्या माध्यमातून महिला नियमीत बचत करतात. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अल्पमुदतीचे कर्ज घेतात. या सर्व प्रकयांतून महिलांना बचतीचे महत्व पटते. बचतीमुळे छोट्या- मोठया कौटुंबिक अडचणींवर मात केल्यावर तिच्यात नवी उमेद निर्माण होते. आपल्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे, असा ती विचार करू लागते. महिलांचे अत्यल्प शिक्षण आणि इतर व्यावसायिक दृष्टीकोनाअभावी उपजीविकेची नवी साधने शोधण्यास तिला अडचण येते. उपजीविकेची साधने निश्चित करताना विशिष्ट अशी कार्यपद्धती अवलंबणे गरजेचे असते. गटासोबत बैठका घेऊन प्रत्येक सभासदांची संपूर्ण माहिती घेणे अत्यावश्यक ठरते. यानंतर प्रत्येक सदस्यांच्या घरी जाऊन संवेदनशिलतेने, आत्मियतेने तिच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली पाहिजे. 

साधारणपणे खालीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबिल्यास उपजीविकेची साधने शोधण्यास मदत होते. कुटुंबांचे उत्पन्न आणि खर्च याचा तपशीलवार अभ्यास केल्याखेरीज उपजीविकेची नवीन साधने शोधता येत नाहीत. त्या अनुषंगाने प्रथम कुटुंबाचे नेमके उत्पन्न किती आहे, याचा तपशील शोधावा. यासाठी सोबतच्या तक्त्यातील उत्पन्न व खर्च याकडे लक्ष केंद्रित करावे. सर्व उत्पन्नाचा विचार करुन वार्षिक उत्पन्न किती आहे, याची माहिती काढली जावी. यानंतर कुटुंबांचा होणारा खर्चाबाबत सर्व कुटुंब सदस्यांसमवेत चर्चा करावी. यामध्ये सोबतच्या तक्त्यामधीाल घटकांचा विचार करावा. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ पाहिला असता बहुतेकवेळा खर्चापेक्षा उत्पन्न कमी असल्याचे दिसून येते. अधिकचा खर्च हा प्रामुख्याने कर्ज, उसनवारी अथवा पशुधन विक्रीतून भागविला जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे खर्च भागविण्यासाठी आणि उत्पन्नाचा स्रोत बळकट करण्यासाठी काय करता येईल, यावरत चर्चा करावी. 

उपजीविकेची नवी साधने ठरविताना कुटुंबातील व्यक्तीचे शिक्षण, क्षमता, कौशल्य, अवगत असलेली कला, उपब्लध साधनसामुग्री याचा विचार करावा. सध्या सुरू असलेल्या उत्पन्न स्त्रोंताना अधिक बळकट करण्यावर अधिक भर असावा. उपजीविकेचे साधन किंवा स्रोत नवीन असल्यास तो व्यवसाय किंवा उपक्रम करण्यासाठी त्या कुटुंबाची मानसिक तयारी आहे का? व शारीरिक क्षमता याचाही विचार करणे आवश्यक आहे. कर्जपुरवठा, परतफेडीची क्षमता, बाजारपेठ, व्यवसायातील धोके याचाही सुक्ष्म अभ्यास आवश्यक आहे. नियोजनात चुका झाल्यास कुटुंब आणखीनच गरीब होण्याचा धोका नाकारता येत नाही.

उत्पन्न 

१. शेतीपासून मिळणारे उत्पन्न
२. रोजगारातुन मिळणारे उत्पन्न
३. मनरेगा योजनेतून मिळणारे उत्पन्न
४. गाय, शेळी,कोंबड्या इ.पशुपालनापासून मिळणारे उत्पन्न 
५. मोहफुले, तेंदूपत्ता यापासून मिळणारे उत्पन्न
६. इतर उत्पन्न



खर्च
१) अन्नधान्यावर होणारा खर्च
२) किराणा खरेदीवर होणारा खर्च
३) आरोग्यासाठी होणारा खर्च 
४) शिक्षणासाठी होणारा खर्च
५) सण,समारंभासाठी होणारा खर्च
८) शेती/मशागतीसाठी होणारा खर्च
९) पशुधन, त्यांचे आजारावरील खर्च
१०) इतर खर्च

श्रीकांत सूर्यवंशी
तालुका अभियान व्यवस्थापक, 
उमेद, तालुका कुरखेडा 

0 प्रतिक्रिया:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.