केंद्र सरकारने नुकत्याच सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री जनधन योजनेङ्कचा स्वयंसहायता गटातील महिलांनी लाभ घ्यावा, यासाठी एटापल्ली तालुका अभियान कक्षातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून पंदेवाही गावातील काटवेली ग्रामसंघाची सभा घेण्यात आली.
या सभेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटापल्ली शाखेचे अधिकारी दीपक त्रिपुरवार यांनी महिलांना मार्गदर्शन केले. बँकेत खाते कसे उघडावे तसेच त्याचे काय फायदे होतात, यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
या सभेस सुमारे १५० महिला उपस्थित होत्या. ७५ महिलांनी सभेतच बँक खाते उघडण्याचे अर्ज भरून दिले. या सभेस उमेदचे तालुका व्यवस्थापक नेताजी आत्राम, विस्तार अधिकारी श्री. हाडके, प्रकल्प संसाधन व्यक्ती भास्कर गड्डी उपस्थित होते.

0 प्रतिक्रिया:
Post a Comment