ताज्या घडामोडी
Loading...
Wednesday, 5 November 2014

Info Post
‘उमेद‘च्या अहेरी तालुका अभियान कक्षातर्फे ७ सप्टेंबर २०१४ रोजी दुपारी एक वाजता आलापल्ली वन विभाग सभागृहात महिला मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात दीडशेहून अधिक महिलांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवर्ग विकास अधिकारी श्री. चांदेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी श्री. फुलझेले तसेच सामाजिक कार्यकत्र्या सौ. सुशीलाताई भगत, जिल्हा व्यवस्थापक (सामाजिक समावेशन) राम पवार आणि तालुका अभियान कक्षाचे सहकारी उपस्थित होते.

प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक अनिल गुंजे यांनी केले. त्यांनी अभियानाची माहिती देऊन आतापर्यंत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कृषी विस्तार अधिकारी फुलझेले यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. अभियान व कृषी योजना याची सांगड घालण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. सौ. सुशीलाताई भगत यांनी अभियानामुळे महिलांत आत्मविश्वास वाढला आहे व त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे मत मांडले. इतर संस्था आणि ‘उमेद‘च्या कामाच्या पद्धतीत फरक असल्याचे त्यांनी मत मांडले. यानंतर जिल्हा व्यवस्थापक (सामाजिक समावेशन) राम पवार यांनी महिला सक्षमीकरणावर विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात श्री. चांदेकर यांनी अभियानाच्या भविष्यकालीन योजना सांगितल्या. पंचायत समितीच्या माध्यमातून असणा-या विविध योजना स्वयंसहायता गटामार्फेत राबविण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला. यासाठी महिलांनी अधिक सक्रिय असावे, असे त्यांनी मत मांडले.

कार्यक्रमाच्या शेवटी सुमारे १७० महिलांनी शिधापत्रिका, आधार कार्ड, विविध शासकीय योजना मिळण्याकरिता नावनोंदणी केली. संचालन श्रीमती शांता खांडेकर हिने केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता ‘उमेद‘चे सहकारी प्रवीण डोंगरे,गंगाधर डोर्लीकर, राकेश दुर्गे, मंदा तोफा, रजनी गड्डम, एकता उमरे, सौ. मंजू डोंगरे, सुनीता उराडे, विनोद बोबाटे यांनी सहकार्य केले.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment